Saturday, December 13, 2025

घ्यावे रामनाम हीच रामसेवा!

घ्यावे रामनाम हीच रामसेवा!ध्रु.
 
नाम हे साधन 
सुगम सोपान 
भक्तिभाव ऐसा आवडतो देवा!१

चित्त शुद्ध होते 
मंदिरच गमते 
देहि देव येत घ्यावया विसावा!२
 
शुद्ध भाव जरी 
तीच प्रेमदोरी 
प्रीतिबंधनात राम जखडावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३४८ (१३ डिसेंबर) वर आधारित काव्य.

भगवंताची सेवा शुद्ध हेतूने नाम घेतल्यास होऊ शकते. प्रपंचात जिला भीती असे म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ती बनते. प्रपंचातील लोभ भगवंताची आवड बनते. आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी आपण आपले बोलणे कमी केले पाहिजे. बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरूर आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावानेनेच होऊ शकते. या भावनेचे मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते. ही शुद्ध भावना आपल्याला तारते, मंदिर आणि समाधी तारत नाही. भगवंताचा विसर न पडू देता त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही?

No comments:

Post a Comment