वैदिक कर्मासंगे घ्यावे भगवंताचे नाम!ध्रु.
नाम घेता अर्थ कळतो
अर्थ कळता लाभ होतो
जीवन सुखवी साधकाचे सहजपणे प्रभुनाम!१
नाम घेतां मीपण गळते
मीपण गळता 'तो मी' पटते
समरसता ही साधुनि देते रघुनाथाचे नाम!२
नाम घेतां संयम जमतो
संयम जमतां मोह संपतो
मोहनिरसना सहाय्य करिते प्रभुनामाचे गान!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३६३ (२८ डिसेंबर) वर आधारित काव्य.
आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे; परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधने सुटत चालली आहेत म्हणून आपण कळवळून नाम घ्या. आपण नाम घेतल्यावर वेदांचा खरा अर्थ कळेल.
No comments:
Post a Comment