ॐ
हे भगवंता, थोपट हलके निद्रा येऊ दे!ध्रु.
हे भगवंता, थोपट हलके निद्रा येऊ दे!ध्रु.
डोळे भरुनी तुला पाहता
तनामनाला मिळे शांतता
'दिवस चांगला गेला सगळा' ऐसे वाटू दे!१
नाम तुझे वदनात असावे
रूप तुझे अंतरी ठसावे
'अजपाजप तर चालविशी तू' हे मजला कळु दे!२
भावनाच जरि तव स्पर्शाची
गुरुकिल्ली ही आनंदाची
'तू तर माझे लळे पुरविले' मजला समजू दे!३
इथे तिथे पाहिले तुला मी
हसलो वदलो तुझ्याशीच मी
'कोऽहं सोऽहं, कोऽहं सोऽहं' कोडे उकलू दे!४
हे प्रभुराया तुझी कृपा ही
सद्गुरुनाथ मिळवून देई
स्वरूपात आनंद साठला तो मज सेवू दे!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७/६/१९८९
पहाटे ५.१५
No comments:
Post a Comment