नाम रामासि आवडते!ध्रु.
ते श्रद्धेने घ्यावे
ते आवडिने गावे
आणी आनंदाचे भरते!१
ते औषध देहासी
ते पोषक आत्म्यासी
मनास उंचविते!२
ते सदाचरण शिकवी
ते भक्ति मनी मुरवी
पराशांति देते!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३४० (५ डिसेंबर) वर आधारित काव्य.
परमार्थात भगवंतांना जे जे प्रिय असते ते ते ओळखून त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करावा. श्रीरामप्रभूला काय आवडते नि काय नाही याची मारुतीरायांना पूर्ण माहिती होती, म्हणूनच त्यांना आवडणारे नाम घेऊन त्यांनी श्रीरामप्रभूंना आपलासा करून घेतला. हे नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या. भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव अजपाजप होय. हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. भगवंताच्या नसते पणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय. "आणखी काही नको" हे पूर्णत्वापासून आले तरच खरे समाधान होईल. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे. भगवंताकडून येणारी शांति हेच समाधान होय. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. या नामातच आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहजी जाता येईल.
तें पोष
आणी आनंदाचे भरतें!,
No comments:
Post a Comment