देही देव आणण्याते देव भजावा ! भजावा! ध्रु.
मीपण येते आड
देव नांदतो पल्याड
बंधनात दु:खे मोठी देहभाव विसरावा! १
नाम साधन हे सोपे
उच्चारिता दु:ख लोपे
नाम गाता गाता लाभे देह मनाला विसावा! २
मना उलटे करावे
नाम नित्य वाचे घ्यावे
नाम जेथे तेथे देव, देव भुले भक्तिभावा! ३
नामाविण नाही सत्य
स्मरा स्मरा त्याते नित्य
नाम मधुर औषधी हृदि धरा दृढभावा! ४
नाम घेता चित्तशांती
नामी निर्मळ विश्रांती
धार धरून नामाची तोषवावे सदाशिवा! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रावर आधारित काव्य
No comments:
Post a Comment