विकासार्थ संयम आहे
विकासार्थ बंधन आहे!ध्रु.
विकासार्थ बंधन आहे!ध्रु.
वृक्ष वाढतो आकाशी
परी बांधला धरतीशी
मुळांविना जीवन त्याचे
असंभाव्य आहे!१
नदी बांधली तीरांनी
सागरास मिळते म्हणुनी
गंभीरता गति लाभूनी
पुढे पुढे वाहे!२
व्यक्ति ही समाजासाठी
पोषणार्थ असते सृष्टी
वृक्ष, मेघ निर्झर वारे -
त्यांत देव राहे!३
संयमात वसते शिस्त
संयमात पाही प्रीत
खूण हीच मानव्याची
भाग्यवंत लाहे! ४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(उपनयन संस्कार गीतावली मधील हे काव्य. व्रत म्हणजे नियम. व्रतबंध म्हणजे नियमाला बांधून घेणे. अभ्यास करण्याकरता हे नियम पाळायचे. विकास साधण्यासाठी बंधन पत्करायचे. ब्रह्मप्राप्ती व्हावी यासाठी या बंधनांचा अंगीकार करायचा.
No comments:
Post a Comment