सोऽहं सोऽहं चिंतन चाले
हृदयस्थाचे दर्शन घडले! ध्रु.
हृदयस्थाचे दर्शन घडले! ध्रु.
डोळे मिटती
वदनी दीप्ती
ध्यानी सगळे भान हरपले! १
भक्ती उमले -
अश्रू झरले
तन अवघे रोमांचित झाले! २
ही गुरुपूजा
भाव न दूजा
मग सोऽहंमय गमले सगळे! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०३.०५.१९७४
मधुवंती
No comments:
Post a Comment