मज अपुला म्हटले
स्वामी धन्य मला केले! ध्रु.
स्वामी धन्य मला केले! ध्रु.
सोऽहं सोऽहं जपता जपता
अद्वैतासी तनी मुरविता
झोके मजला दिले! १
जवळ बसवुनी, गाउनि गीता
परमार्थाचा पाठ शिकविता
मार्गी मज लाविले! २
अभंग हृदयासी संजीवन
अमृतधारा अविरत बरसुन
सुखस्नान घातले! ३
रामकृष्णहरि जपत वैखरी
सोऽहं चा प्रतिसाद अंतरी
स्थैर्य, धैर्य शिकविले! ४
माय माऊली स्वरूपनाथा
‘राम’ लाडका लववी माथा
हृदयाशी धरिले! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०३.१९७४
No comments:
Post a Comment