संतसंगे दोष नासताती!ध्रु.
नामाची आवड
विषयी नावड
संत हाती मोक्षसुख देती!१
नामाची आवड
विषयी नावड
संत हाती मोक्षसुख देती!१
पळविती पाप
निवारिती ताप
संत मेघ होउनि वर्षताती!२
संतवाणी गोड
अमृताची जोड
संत स्वये निर्भयत्व देती !३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९६ (५ एप्रिल) वर आधारित काव्य.
सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्ध तो शुद्धच राहतो. विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. ज्यास भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कोणास लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही.
No comments:
Post a Comment