सगळी तीर्थे तुझ्यांत वसती
हो ना गं आई?
माझे वंदन तव पायी! ध्रु.
तुमची सेवा माझा मेवा
सर्वसुखाचा अमोल ठेवा
मायपित्याहुनि क्षेत्र पुण्यकर अवनीवर नाही! १
जुन्यांतुनी जे मिळते कांचन
स्फूर्तिप्रद ते तेच चिरंतन
दिव्य वारसा आनंदाने मिरविन मी डोई! २
तीर्थोतीर्थी दादा हिंडत
कस्तुरिमृगसम सुगंध शोधत
त्रैलोक्याचे सुख साठवले सदनातच पाही! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्री गणेशदर्शन – लेखनकाल – १९७२)
No comments:
Post a Comment