आनंद होइ कैसा? घ्यावा स्वत:च शोध
मन स्वस्थ होय कैसे? लावी स्वत:च शोध! ध्रु.
मन स्वस्थ होय कैसे? लावी स्वत:च शोध! ध्रु.
स्वानंद का रुचेना?
इच्छा न टाकवेना
रामामनी असे जे होते तसेच बोध! १
अभिमान सोडताच
होऊनि मुक्त नाच
चिंता मुळीच सरली, उठणार नाही क्रोध! २
नामी असे रमावे
रामेच की भुलावे
जगि आत्मदान श्रेष्ठ हे जाणि तो सुबुद्ध! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २१४, १ ऑगस्ट वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment