श्रीसमर्थां आरती!
रामदासा आरती!ध्रु.
रामदासा आरती!ध्रु.
जांब जन्मे धन्य केले
सान थोरा हर्षवीले
देवभूमी गमत ती!१
वाहिला शिरि देवराणा
शैशवी त्या चिंतिताना
कौतुकावह ती धृती!२
टाकळीला ध्यास त्याचा
छंद त्या सर्वोत्तमाचा
लाभु दे रामी रती!३
सर्व भारत पाहिला
राम अंतरि स्थापिला
योजिली नामी कृती!४
" खात ना आम्ही कुणाचे -
दास केवळ राघवाचे! "
द्या निराशा थोर ती!५
राष्ट्र ज्यांसी देव हो
देशकारण धर्म हो -
त्या तुम्हां ही आरती!६
देशकारण धर्म हो -
त्या तुम्हां ही आरती!६
दासबोधा वाचताना
बोल परखड ऐकतांना
भक्त भाविक हर्षती! ७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.१२.१९७६
(पाचव्या कडव्यात निराशाचा अर्थ प्रचलित निराशा नव्हे. निरपेक्ष वृत्ती किंवा ज्याला काही ऐहिक आशा नाहीत असा असावा .)
No comments:
Post a Comment