हात जोडितो हेच विनवितो
तुझे प्रेम लागो, रामा! तुझे प्रेम लागो!ध्रु.
तुझे प्रेम लागो, रामा! तुझे प्रेम लागो!ध्रु.
अहंपणा गेला खोल
दवडिलाच वाया काळ
भक्ति अंतरी या जागो!१
कळते परि मुळि ना वळते
जालकात मन गुरफटते
दुःख मेळा सत्वर पांगो!२
ठेवशील - राहू तैसे
सांगशील - वागू तैसे
अधिक काय मागो?३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३४ (१३ मे) वर आधारित काव्य.
आपला अहंपणा खरोखर किती खोल गेला आहे पाहा! आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो.
संतसंगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे ! पण तसे तर दिसत नाही; मग नडते कुठे ? याचे मुख्य कारण म्हणजे, आपण स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही.
No comments:
Post a Comment