हा प्रपंच परमात्म्याचा!
तद्भजना माझी वाचा!ध्रु.
तद्भजना माझी वाचा!ध्रु.
विश्वाचा राम नियंता
चिंता मम त्या भगवंता
तात्पर्य मी न देहाचा!१
रामाने सगळे दिधले
रामाने मज पोशियले
मी कृतज्ञ म्हणुनि त्याचा!२
ठेविले तसेच रहावे
सुखदुःखी त्यास स्मरावे
भजनास वाहिली वाचा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१९ (१४ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.
परमात्म्यास ओळखण्यास, प्रपंच त्याचा आहे हे जाणून करावा. जगाचा कोणीतरी कर्ता हा असलाच पाहिजे तो कोण हे आपणास समजत नाही इतकेच. जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो व संहारही करणारा तोच असतो. तर मग आपणास तरी त्यांनी दिलेल्या संसारात काही बरेवाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे. जो प्रपंच त्याने आपणास भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्यास वाटेल तेव्हा हर प्रयत्नाने आपणास काढून लावता येणे शक्य असता आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे? तर तो त्याचा आहे असे समजून वागावे व जेव्हा तो नेण्यास येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत.
जेथे रामाचे नाव। तेथे माझा ठाव।
जेथे नामाचे स्मरण। ते माझे वसतिस्थान।।
No comments:
Post a Comment