Wednesday, July 15, 2026

रामचंद्रा शरण जावे!

नाम घ्यावे, गान गावे
रामचंद्रा शरण जावे!ध्रु.

संत येतिल धुंडित
वृष्टि करतिल संतत
त्यात आपण चिंब व्हावे!१

काम करतिल सद्गुरू 
बांधतिल मन वासरू 
भक्तिने त्या बोलवावे!२

भार सगळा त्यावरी 
टाकुनी जपणे श्रीहरि 
नामरंगी दंग व्हावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

(गोंदवलेकर महाराज प्रवचन १९७, १५ जुलै वर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment