गीतेची शिकवण आहे "तुझा अधिकार कर्मावरच आहे, फलावर नाही".
कर्म निसर्गदत्त आहे. इंद्रियांचे नियमन मनाने करावे लागते. कर्म करीत असताना ही इंद्रिये स्वाधीन ठेवणे हाच कर्मयोग. योग वृत्ती ठेवून सर्व व्यवहार करावा. फलहेतूने कर्म करणारा होऊ नकोस.
कर्म निसर्गदत्त आहे. इंद्रियांचे नियमन मनाने करावे लागते. कर्म करीत असताना ही इंद्रिये स्वाधीन ठेवणे हाच कर्मयोग. योग वृत्ती ठेवून सर्व व्यवहार करावा. फलहेतूने कर्म करणारा होऊ नकोस.
तुझा तर कर्मावर अधिकार
फलाचा का करतोस विचार
तुझा तर कर्मावर अधिकार!ध्रु.
स्वार्थी वृत्ती दे दे सोडुन
जनी जनार्दन घे घे जाणुन
परमार्थाला आड येतसे पदोपदी अविचार!१
सुखदुःखांकित जन्म मानवी
संयमीच जो प्रश्न सोडवी
आत्मसंयमी मनोनिग्रही कधी न घे माघार!२
स्वभाव सात्विक करता येई
अशक्य जगती काही नाही
श्रवणे, मनने, उपासनेने उदात्त मन होणार!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
मे १९८३
No comments:
Post a Comment