Friday, July 17, 2026

हे अधिका शुभमंगल सुख दाता

हे अधिका, आलास जसा तू, 
सुधारून जन, सरता हो 
शुभमंगल सुख दाता हो!ध्रु.

'थांब जरासा' सुचविलेस तू 
'आत जरा बघ' विनविलेस तू
दानासाठी हात दिलेला 
कळून आता वळले हो!१

तुला सुजन ' पुरुषोत्तम ' म्हणती 
भागवताची कथा ऐकती 
देहबुद्धि पालटण्यासाठी 
व्रते विविध आचरती हो!२

'अशीच दुनिया जगेल जगली 
कधी ऊन तर कधी सावली'  
रामाविण ना कुणी निदानी
अंतरि हे बिंबविता हो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२० ऑगस्ट १९९३
अवतरण चिन्हातल्या ओळी कै. माडगुळकरांच्या आहेत.

No comments:

Post a Comment