स्वर : माधुरी धर्माधिकारी
मंत्र राम कृष्ण हरि!
स्फुरले अभंग हे ईश्वरी!ध्रु.
पाहू विठ्ठलाचे मुख
तेचि माझे सर्व सुख
सोऽहं घोष घुमे अंतरी!१
जया आपंगिता नाही
तया धरावे हृदयी
हलके पुसणे अश्रूसरी!२
जेणे काव्य लिहवले
तेणे डोही टाकविले
गंगा धरिते गाथा शिरी!३
गाता विठ्ठलाचे गुण
नर होय नारायण
ऐशी नवलाई भूवरी!४
नको धन नको मान
काय लौकिक सन्मान?
विठ्ठल वदो सदा वैखरी!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment