वस्तूसाठी मानव जगतो
आनंदाते म्हणून मुकतो
क्षणोक्षणी अंतरी जळे!१
नामस्मरणी संतत राहू
नामामाजी रामा पाहू
तर भक्तिकमल हलके उमले!२
निजकर्तव्यी मग्न असावे
फलाशेत मन नच गुंतावे
वस्तुरहित आनंद कळे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २२७, १४ ऑगस्ट वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment