मंगलमूर्ती मोरया! ध्रु.
आठ अक्षरे केवळ ही
स्वानंद नांदे या देही
अनुभव ऐसा घेऊ या! १
जगभर का भटकायाचे?
अभ्यासा घरी करायचे
गणेशमूर्ती ध्याऊ या! २
सिंदुरचर्चित तव मूर्ती
दुर्वांकुर देती तृप्ती
आनंदमोदक सकलां द्या! ३
मागायाचे सरो सरो
दानापुरता देह उरो
देहभाव न्या न्या विलया! ४
पंचखाद्य बहु आवडते
अर्थर्वशीर्षे सुख मिळते
अज्ञानातुन मुक्ती द्या! ५
रामाने मन रमवावे
कृष्णाने ज्ञानच द्यावे
हरि हरि वदवा मोरया! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment