सद्गुरूच माझी आई
लाविते पणा पुण्याई! ध्रु.
लाविते पणा पुण्याई! ध्रु.
चुकते कोठे? मजसी दाखवी
ज्ञानकवळ प्रेमाने भरवी
निजविण्या गात अंगाई!१
माझे माझ्याजवळच साधन
का हिंडावे वृथाच वणवण?
अनुभवास आणुनि देई!२
नाम मूर्तिमंत सद्गुरु माऊली
अजपाजपही होउन ठेली
दोन्ही ठिकाणी राही!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन क्र. १८५, ३ जुलै वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment