ज्या दिवशी सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह दिला त्याच दिवशी आपण धन्य झालो
गुरु जयास म्हणती आपुला
तो धन्य धन्य झाला!ध्रु.
अंगुलि धरुनी सवे चालती
राजपथावर सहज आणती
मार्ग जये आक्रमिला!१
कोण मी? असे चिंतन घडले
मी परमात्मा ध्यानी आले
स्वरूपी बोध जया लाभला!२
नामरत्न सद्गगुरुनी दिधले
देहबुद्धिचे बंधन तुटले
साधक रामपदा गेला!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन १९८, १६ जुलै वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment