भजन करा! भजन करा!
रामाला विसरु नका
कृष्णाला विसरु नका!ध्रु.
रामाला विसरु नका
कृष्णाला विसरु नका!ध्रु.
श्वासावर लक्ष हवे
अभ्यासी चित्त हवे
सज्जन हो घाई करा!१
कणा ताठ राहू दे
भक्त धीट वाटू दे
टाळ्यांचा गजर करा!२
तुकड्या तर वेडा हो
भजन मात्र पेढा हो
भक्तीचा मार्ग धरा!३
का भजना लाजावे?
का देवा मागावे?
देवाला दास करा!४
मीरा ही घेत श्याम
रामदास घेत राम
देव आपलाच करा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०८.१९८४
No comments:
Post a Comment