संगीताचे नम्र उपासक
युगनिर्माता दोघे गायक
कविता करती गीत वाटवे
फडके तर स्वरचित्रनिर्मिती! १
भावभावना येती उमलुन
श्रोता बसलासे सरसावुन
दिलखेचक चालींचे लेणे
कलावंत कवितेस अर्पिती! २
कवीस असते सांगायाचे
मर्म तयाचे अचूक जाणुन
साज स्वरांचा असा चढवती
निशाण संतोषाचे फडके! ३
सरस्वतीची बाळे दोन्ही
स्वरयज्ञे अजरामर झाली
अतूट दोघांची या मैत्री
मने एक जरी भिन्नच शैली! ४
गा बाळांनो असे अखंडित
स्थळकाळाच्या पुसल्या सीमा
फुले उधळती कृतज्ञ श्रोते
सगळ्यांच्या मनि शरद पौर्णिमा! ५
रचचिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०६.२००१
No comments:
Post a Comment