Wednesday, July 13, 2022

माझे तारक श्रीसद्गुरू! एकमेव आधारू!

सद्गुरूंची आवश्यकता का आहे?

माझे तारक श्रीसद्गुरू! एकमेव आधारू!ध्रु.

खरे सुख कुठे स्वये सांगती
बोट धरुनि नेतात संगती
स्नेहभवन सद्गुरु!१

विषयातीत स्थिती तयांची
ओढ तयांसी परमात्म्याची
परब्रह्म ते स्मरू!२

देहोऽहं ची भ्रांति सारीती
सोऽहं ची देतात प्रचीती
सर्वस्वचि सद्गुरू!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन क्र १८३, १ जुलै वर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment