Sunday, July 10, 2022

ते "स्वरूप" तुजलाही भेटते सदा

ते "स्वरूप" तुजलाही भेटते सदा
ध्यानाचा नित्यनेम पाळशी यदा!

सोऽहं चे करित स्मरण
कर्म करित बनत निपुण
प्राशन कर आनंदे भक्तिची सुधा!

हळु हळु जातील दोष
आत्म्याला होय तोष
चिन्मय तू पूर्ण स्वये जाणशी तदा!

भक्तीने होत ज्ञान
श्रद्धेने जमत ध्यान
साधकास सद्गुरुची भेट हो सदा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०७.१९८९

No comments:

Post a Comment