Saturday, July 23, 2022

अवघी देवाची लेकरे..

अवघी देवाची लेकरे
सारी देवाची लेकरे!ध्रु.

देव शिरी दाट छाया
देव माउलीची माया
जाणा हेच सार खरे!१

भेदाभेद महापाप
जनी वाढवी संताप
उराउरी भेटा सारे!२

धर्म पाळा माणुसकीचा
देव गोरगरीबांचा-
देवा प्रेमभाव पुरे!३

नसे ठावा कोणा धर्म -
कोण जाणे याचे मर्म?
देवा मनी पहा बरे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
पिलू कर्नाटकी -:सुख देवासी - भजनी धुमाळी
(शिर्डीच्या साईबाबांच्या चरित्रावर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment