गुरु हाच देव, असो असा भाव!ध्रु.
गुरु न देहात
गुरु साधनात
गुरु पार लावी साधकाची नाव!१
गुरु हाच कर्ता
गुरु हाच भर्ता
अनन्यता ऐसी अंतरात ठेव!२
गुरुचा सत्संग
घडवी निःसंग
चित्तशुद्धि करिते गुरुचेच नाव!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २०६, २४ जुलै वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment