श्रद्धेचा लाव दीप, मुद्रेवर स्मित ज्योती
दीपावलि नित्याची साधुसंत अनुभवती!ध्रु.
दीपावलि नित्याची साधुसंत अनुभवती!ध्रु.
धन येते धन जाते मोही का गुंतावे
दुःख काय कायमचे का कोणी कुंथावे
ईश्वरीय पूर्ण कृपा तुमच्या आमच्यावरती!१
धीर धरी, सोस जरा घोळव मनी रामनाम
तू प्रसन्न, जग प्रसन्न घर तुझेच शांतिधाम
शील हेच इहलोकी धन साधु जपताती!२
कोसळते घर सावर - तुटलेली जोड मने
कौशल्ये मूर्ति घडव - पूजन कर भक्तीने
श्रीशाला सर्व श्रेय, सन्मति ही संपत्ती!३
एक एक गुण वेची रसिक मने सूज्ञपणे
विश्वाच्या अंगणात विहर जरा मुक्तपणे
स्नेहाची ज्योत तूच ठेव अशी पाजळती!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.११.१९८७
No comments:
Post a Comment