माधव सदाशिव गोळवलकर
ऋषितुल्य गुरुजी सेवातत्पर!ध्रु.
ऋषितुल्य गुरुजी सेवातत्पर!ध्रु.
वेद जणू हा समूर्त झाला
मुद्रेवर प्रकटला जिव्हाळा
संवाद जसा अमृतनिर्झर!१
प्रतिपादन निर्धारे करती
तत्त्वावरती ठाम राहती
निर्वैर तसे करुणासागर!२
संघकार्य सर्वस्व मानले
ज्ञानभक्ति संमीलन झाले
मौनहि त्यांचे ते बलवत्तर!३
सप्तर्षीचे येथे दर्शन
सारगर्भ ये बौद्धिक उमलुन
यासम हा हो हिंदुभूमिवर!४
विवेक आनंदासह येथे
रामकृष्ण वाटतात येथे
आवरावया हवाच गहिवर!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०२.१२.२००२
No comments:
Post a Comment