आसक्ति मूळ दु:खाचे
भक्तीच राज्य सौख्याचे! ध्रु.
भक्तीच राज्य सौख्याचे! ध्रु.
‘मी करतो’ ऐसे म्हणणे
बंधनात आपण पडणे
हे जिणे काय कामाचे? १
घे रामनाम दिनराती
तो राम खरा सांगाती
अम्ही दास न कुणि देहाचे! २
जो विषयि नसे आसक्त
देहात राहुनी मुक्त
करि स्मरण रामचंद्राचे! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ३०७, २ नोव्हेंबर वर आधारित काव्य
आसक्ती वस्तूंमध्ये नसावी भगवंताच्या ठिकाणी असावी.
No comments:
Post a Comment