सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि तू मला एकट्यालाच शरण ये - यामुळे मी तुला सर्व पाप कर्माच्या फलापासून मुक्त करीन. म्हणून तुला कशाचीही भीती नाही. हे आश्वासन ऐकल्यावर मनात उठलेला तरंग ..
********
आलो शरण तुला श्रीकृष्णा!ध्रु.
तव गीता मज अंगाई
भवदुःख लयाला नेई
दे मना जोडुनी पवना!१
तू नाम वदवुनी घेई
तू सत्कर्मी रति देई
गीतेतुन अंतरि ये ना!२
मन तनात गुंतुन राही
तव नाम न वदनी येई
निर्मळ कर घाली स्नाना!३
तू श्रवणी, स्मरणी येई
मन चंचल सुस्थिर होई
कर पूर्ण मला संपूर्णा!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.१२.१९८३
No comments:
Post a Comment