ॐ गं गणपतये नम:
प्रभाती दिसली मंगलमूर्ती! ध्रु.
डोळे मिटले, ध्यान लागले
तनामनाचे भान हरपले
निवासा आली जणु शांती!१
मनास शुण्डेपरि वळवावे
आत्मरूप ते चिंतित जावे
हळुहळू शिकवित मज ‘गणपती’!२
तत्परतेने श्रवण करावे
प्रसन्नमुख सर्वदा असावे
ज्ञानिया शिवे कुठुन भ्रांती?३
त्रिशूल करिचा अरि माराया
मोदक करिचा मोद द्यावया
बसावे ध्याना एकांती!४
तनु मी नाही, मनही नाही
सोऽहं आत्मा जाणिव होई
सिद्धि ही दे मंगलमूर्ती!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.१०.१९८९
No comments:
Post a Comment