आले, आले हो आले ऽऽआले
गणपति बाप्पा आले! ध्रु.
गणपति बाप्पा आले! ध्रु.
माती, पाणी, उजेड, वारा
मिसळुन घेउन सर्व पसारा
समूर्त होउन आले! १
शेतकऱ्यांचे, कामकऱ्यांचे
स्त्री पुरुषांचे, मुलामुलींचे
नकळत नेते झाले! २
मिळवा विद्या, मिळवा शक्ती
जगण्याची घ्या शिकून युक्ती
आनंद उधळत आले! ३
डोळे बारिक सूक्ष्म पहाया
लंबोदर हे क्षमा कराया
अभयदानही दिधले! ४
अंकुश राहो सदा मनावर
पहा अंतरी आपण क्षणभर
हृदयमंदिरी वसले! ५
काळावरती स्वार व्हायचे
विघ्नांनाही हटवायाचे
उत्साहे मन भरले! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०९.१९८८
No comments:
Post a Comment