नर जन्माचा हेतु काय तो – ध्यानी घे रे नरा! ध्रु.
कर्मि गुंतसी, जागी फिरसी
आशा धरसी, मोही रुतशी
फेऱ्यातच या राहिलास तर व्यर्थ जिणे तव नरा!१
जीव असे तो देहि देहपण
तो उडताक्षणि सरे देहपण
कर्तेपण तू देई सोडुनि सावध हो रे जरा!२
करू नये ते करवित माया
हरिभजनासी साधन काया
यत्न न सोडी श्रद्धा ठेवी शरण जाई प्रभुवरा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २८२, ८ ऑक्टोबर वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment