मी दास तुझा, दास तुझा
दास तुझा श्रीरामा!
मम हृदयी ये, हृदयी ये
हृदयी ये श्रीरामा!ध्रु.
तू सदैव जवळी राही
मी स्मरता दर्शन देई
रे नामच तू, नामच तू
नामच तू श्रीरामा!१
घे करवुनि काही सेवा
ती संधिच मजला मेवा
नच आस दुजी, आस दुजी
आस दुजी श्रीरामा!२
घे खोल अंतरी ठाव
हृदयी ये होउनि भाव
तू प्रेम झरा, प्रेम झरा
प्रेमझरा श्रीरामा!३
मन नामी रमव रमव रे
चरणी ते जडव जडव रे
मी प्रार्थितसे, प्रार्थितसे
प्रार्थितसे श्रीरामा!४
तव चरित्र गाउन घेई
सगुणातुन निर्गुणि नेई
कर निर्मळ रे, निर्मळ रे
निर्मळ रे श्रीरामा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
( समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रावर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment