गोंदवलेकर महाराज प्रवचन १८७, ५ जुलै वर आधारित काव्य
अनन्यभावे शरण तुला मी, आलो श्रीरामा! ध्रु.
अशीच सेवा करवुनि घेई
हीच विनवणी तुझिया पायी
दर्शन मिळण्या सुपात्र ठरण्या उच्चारिन नामा! १
घरातला तू कुणी वाटते
अबोध काही जुळले नाते
सुखदु:खे सांगावी तुजला रे गुणैकधामा! २
प्रारब्धाचे भोग ललाटी
विधिने जे जे लिहिले असती
भोगण्यास दे अपार शक्ती, नामी दे प्रेमा! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment