दत्तात्रय पाठीशी असता
का करिशी चिंता? ध्रु.
का करिशी चिंता? ध्रु.
दत्त दत्त म्हण
मन हो उन्मन
सोडी चंचलता! १
विचार सुचती
प्रश्नहि सुटती
तो तुज सावरता! २
स्मर दत्ता रे
दत्त तुझा रे
दत्ताची सत्ता! ३
दत्तच कर्ता
दत्त करविता
ध्यानी धर आता! ४
अशुभ टळतसे
शुभच होतसे
दत्त दत्त जपता! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०१.१९८९
नारायण महाराज केडगाव यांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील हे एक काव्य
No comments:
Post a Comment