गोंदवलेकर महाराज प्रवचन २५३, ९ सप्टेंबर वर आधारित काव्य
("तू आहेस, मी नाही" ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झाालो असे सार्थपणाने म्हणता येईल)
नाम घेता रमत रामीं
बोल येती कुठुनि कानीं
“आहेस तू, नाहीच मी” ! ध्रु.

जे पहावे त्यात दिसशी
श्रवणि यावे त्यात असशी
बंध पडती पामराला मुक्त मी आनंद मी! १
शरण जाण्या भीति कसली?
नामरंगी भक्ति हसली
देवबुद्धि सूर्य उगवे देह बुद्धीच्या तमीं ! २
ध्यास लागो रामराया
आवरी तव घोर माया
चंचला वृत्ति स्थिरावी मी रहावे सौख्यधामीं ! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment