तिलका, गाऊ आरती! तिलका, गाऊ आरती!ध्रु.
मुनिश्रेष्ठा घे त्रिवार वंदन
तूच भासशी गंधित चंदन
कृतार्थ झाली कविताशक्ती! गाऊ आरती!१
स्वत्वरक्षणा, राष्ट्रिय शिक्षण
स्वदेशिने बांधवहित रक्षण
बहिष्कार शस्त्राते उपसुन
स्वराज्यध्येया मांडुनि दिधली, चौसूत्रे हाती!२
तुझिया स्मरणे मन उजळावे
भव्य दिव्य हातून घडावे
शतकांचे कार्पण्य सरावे
ध्यास हाच चित्ती, गाऊ आरती!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
अपूर्ण
(पुढच्या कडव्यांचे पान मिळाले नाही)
(पुढच्या कडव्यांचे पान मिळाले नाही)
No comments:
Post a Comment