जय जय राम कृष्ण हरि!
जय जय राम कृष्ण हरि!ध्रु.
जय जय राम कृष्ण हरि!ध्रु.
व्हावा नामाचा गजर, जळे पापाचा डोंगर
दयाघन पाडे सरी!१
राम काय अयोध्येचा? कृष्ण काय द्वारकेचा?
हरि ज्याच्या त्याच्या उरी!२
व्हावा धर्माचाच जय, देहभावाचाच लय
हेच गर्जू दे वैखरी!३
जाता मने पंढरीला, जाता मने आळंदीला
हात ज्ञानाई घे करी!४
टिको नामाचाच नेम, वाढो विठ्ठलाचे प्रेम
याव्या नेत्रातून सरी!५
जेथे नाम धरी जोर, तेथे घर हो मंदिर
ऐसी पंढरीची वारी!६
हरिपाठ कळू लागे, एका तुका पुढे मागे
धन्य रामाची नगरी!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.८.१९९५
No comments:
Post a Comment