Saturday, September 28, 2024

भंगावे ना कदा समाधान


एवढाच वर दे रघुनाथा 
समाधान ना भंगावे!ध्रु. 

तू पाठविले येथे आलो
तू बोलविले  इथुन निघालो 
मी माझे विलया जावे!१ 

असो अमीरी असो फकीरी 
शरीरीहि वा घरि वा दारी 
नाम तुझे नच विसरावे!२ 

विजय मिळाला कृपा तुझी रे 
अपयश आले तव इच्छा रे 
जरा न विचलित मन व्हावे!३

ओवी ज्ञानेशाची गावी 
मननाने ती तनि मुरवावी 
सन्मार्गावर चालावे!४ 

जीवनात जर गीता आली 
दीपावली तर सुंदर झाली
सुखदुःखी सम मी व्हावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
प्रसिद्धी : सप्टेंबर २००१ गीतादर्शन

No comments:

Post a Comment