ॐ गं गणपतये नमः ।
श्री हत्ती गणपती, नवी पेठ, पुणे ३०
हत्तीवर आरूढ गणपती
तया पाहता निवते दृष्टी!ध्रु.
पुढे पुढे हा पुढे चालला
विघ्नांना ना कधीही भ्याला
भक्तही सगळे घेती स्फूर्ती!१
करिचा भाला असे रोखला
वाघाचा मग व्यर्थच हल्ला
आत्मश्रद्धा पहा कशी ती!२
मांगल्याचा गणेश सागर
सद्भावाचा घडवी जागर
कलियुगात या संघच शक्ती!३
मत्तभेदांचा सारू अडसर
तरून जाऊ सागर दुस्तर
गजाननाची करु या भक्ती!४
पाशांकुशधर वीर विनायक
हा तर जनगणमन अधिनायक
अभिनव भारत गात आरती!५
नवी पेठ घे व्रत हे खडतर
घराघरातुन जो तो साक्षर
विसरायाच्या जातीपाती!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जानेवारी/फेब्रुवारी १९९५ गणेश जयंती निमित्त प्रसिद्ध केलेलं काव्य
No comments:
Post a Comment