हे दयाघना, श्रीगजानना
तूच आवरी आमच्या मना!ध्रु.
तूच आवरी आमच्या मना!ध्रु.
शांत मज करी
स्वस्थही करी
प्रेम ओतुनी शिकव साधना!१
क्रोध नावरे
चित्त बावरे
मार्ग दाखवी हीच प्रार्थना!२
काय मी करू ?
मी कसे करू ?
तोल नावरे श्रीगजानना!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०९.१९७९
(शिक्षण, शील संस्कार वाचताना)
No comments:
Post a Comment