ॐ
भगवंता इतके द्यावे
मज अर्जुन होता यावे!ध्रु.
ती व्याकुळता मज द्यावी
ती अगतिकता मज द्यावी
मज शरणागत बनवावे!१
जिज्ञासा जागृत व्हावी
मम भ्रांती विलया जावी
सोऽहं हे कळो स्वभावे!२
नामाचा घुमवा घोष
तर मनास होई तोष
कर्तव्य शीघ्र उमजावे!३
भक्तीचा बांधुन सेतू
पुरवावा माझा हेतू
मज कृपादान लाभावे!४
२८.०१.१९८४ नंतर
रात्री २.३०
(श्रीमदभगवद्गीता जशी आहे तशी (पुस्तक)
वाचताना)
No comments:
Post a Comment