नको बघूस बाहेरी
तू पहा जरा अंतरी!ध्रु.
तू पहा जरा अंतरी!ध्रु.
विषय वेधिती
फरफट परि ती
नव्हे नव्हे रे बरी!१
नाम घेइ रे
मना वळव रे
जाग जाग झडकरी!२
नाम स्मरणे
विषय विसरणे
साह्य करिल श्रीहरी!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३४२ (७ डिसेंबर) वर आधारित काव्य.
साधारण प्रापंचिकाची ओढ विषयांकडे असते. आजवर कोणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का? याचा प्रत्येकाने विचार करावा. साशंक वृत्तीच्या ठिकाणी समाधान सहसा नसतेच. विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. भगवंताचे सत्यत्व ज्याच्या अंतःकरणाला पटले तो विषयांमध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखांच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून अलिप्त राहील. या झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे पण ते विसरणे औषधाने वगैरे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहून आणले पाहिजे.
No comments:
Post a Comment