Thursday, September 26, 2024

विरंगुळा हवाच



एक वेळ तरी सकल सुजनहो
विरंगुळ्याला यावे! ध्रु.

थोडासा जप, प्रवचन वाचन 
संस्कारास्तव प्रकटच चिंतन 
घडते, कसे पहावे!१

मन का थाऱ्यावरती नाही 
व्याकुळता ही स्पर्शुन जाई 
अश्रू नयनी यावे!२

चुकले कोठे इथे उमगते
आशाकलिका हळू उमलते
मीच मला सुधरावे!३ 

विरंगुळा दे नवसंजीवन 
परमार्थाची सुंदर शिकवण
समूहात मिसळावे!४ 

अधांतरी मनुजाचे जीवन 
अफाट विश्वी एक धूलिकण 
नामी विरुनी जावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
प्रसिद्धी गीतादर्शन जानेवारी २००२

No comments:

Post a Comment