तळमळ धरी अंतरात
प्रभु दिसेल आत शांत!ध्रु.
प्रभु दिसेल आत शांत!ध्रु.
देवाविण गमत गोड
विषय म्हणुनि सोड सोड
स्वस्थ राही तू निवांत!१
चित्त शुद्ध कर आधी
पांगुळेल मग उपाधी
नामरत्न घे करांत!२
जी गोडी रामाची
ती प्रचीति संतांची
घेई नाम दिवसरात!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९९ (८ एप्रिल) वर आधारित काव्य.
ज्याला भगवंताचे अस्तित्व मान्य नाही त्याला भगवंताची प्रचीति कशी येणार? प्रपंचात आनंदाची प्रचीति यायला भगवंताची तळमळ धरावी लागते. जगात भगवंताच्या सेवेशिवाय काही नाही हे ज्यांना कळले ती खरी प्रचीति. भगवंताशिवाय जे जे गोड लागते त्याला विषय म्हणावे. ज्या घटकेला चित्त शुद्ध झाले त्या घटकेला प्रचीति येते. मी वाटेल तसे वागावे आणि संतांची प्रचीति यावी हे कसे व्हावे? भगवंताची गोडी लागेल तेव्हाच संतांची प्रचीति आली असे म्हणावे. सर्वजण उलटले तरी राम माझा खरा असे म्हणावे. राम माझा दाता व धनी आहे ही बुद्धि ठेवावी व तसे वागावे.
No comments:
Post a Comment