येता जाता मनी घोळवा गीतेतील विचार!ध्रु.
जेव्हा केव्हा अपयश येते
घोर निराशा पदरी पडते
वैफल्याने जगून हानी आपलीच होणार!१
श्रीमंतीने प्रश्न न सुटती
आधिव्याधी तन पोखरती
हरिनामासह स्वकर्म घडता मन:शांति मिळणार!२
ज्याची प्रज्ञा स्थिरावलेली
त्याची यात्रा कशी चालली
अभ्यासाने अनुकरणाने सुपंथ सापडणार!३
ओघे आले काम करावे
श्रीकृष्णार्पण असे म्हणावे
नकळत होते सफल साधना अनुभव हा येणार!४
एक एक अध्याय वाचता
श्रवणे मनने चिंतन घडता
अजून अत्यावश्यक गीता ती तर मूलाधार!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०२.०३.१९९५
No comments:
Post a Comment