Saturday, September 14, 2024

जीवन सुखदुःखांचा काला हरिभक्तांना प्रसाद गमला !

जीवन सुखदुःखांचा काला 
हरिभक्तांना प्रसाद गमला !ध्रु.

जन्मासंगे मृत्यु जन्मतो
कुणी मित्र तर शत्रु कुणी तो 
तो ज्ञानी हे भान जयाला ! १ 

धैर्याने ते दुःख सहावे 
सावधतेने सुख भोगावे
भुरळ न पडते हरिभक्ताला ! २

द्वंद्वामध्ये नच गुंतावे 
नव्हे देह मी हे बिंबावे
लाग साधका अभ्यासाला! ३ 

जो योगी त्या शत्रु मित्र सम 
जो योगी त्या हारजीत सम
धैर्यमेरु तो योगी गमला !४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
६ मार्च १९९५  (योग्य जीवनदृष्टी वाचताना)

No comments:

Post a Comment